Posts

पुण्यातील प्रसंग !

 2nd Jan.2021. आणि शेवटी मी पुण्यात उतरलो. शिवाजी नगरच्या COEP या अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर बस थांबली. आईने जाळीच्या देवाच्या यात्रेतून घेतलेली माझ्यासाठी चाकाची बॅग होती माझ्यासोबत.  लहानपणी खूपच हौस होती अश्या बॅगींची. पण आता या भल्या आकर्षक वाटणाऱ्या थैलीचे पारायण दिसणार हे कुठं मला ठाऊक होतं.  उतरलो तसा मला पुण्याचा ' विकास ' दिसू लागला.पुणे म्हणजे अतिशय आकर्षक शहर.मनाला भारावून घेईल अशी मराठी बोलणारी,मराठी जपणारी माणसं इथे आढळतात. पुण्यात ज्ञानाधरित समाज आढळतो.  ज्ञानावर आधारलेली माणसं इथे आढळतात. संगीताची 'मैफल' असते.हा शब्द सुद्धा मी पुण्यातच ऐकला.'करायचंय, लिहायचंय, वाचायचंय' अशी शब्दांच्या शेवटी लाडू बाई लाडू ' य ' लावणारी मंडळी माझ्या कानावर रस्त्याने जाताना पडत गेली. वाहतुकीसाठी वेगळे मार्ग.शिवाय मी बस मधून थेट स्ट्रीट पाथ वर उतरलो. प्रत्येक क्षणाला सिटी बस.! पुण्यातील प्रवाशांची सोय पाहून मी थोडासा सुखावलो.शिवाय मेट्रोचं देखील काम सुरू होते. माझ्यासोबत नेहमीच वादविवाद आणि चर्चा करणारे मन आहे. हल्ली ते प्रत्येकाजवळच आहे. त्या प्रवाशांकडे प...